UBT Protest : छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरु; भारत-पाक सामना प्रकरणी संताप
थोडक्यात
दुबईत आज (14 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होत आहे.
“माझं कुंकू, माझा देश” या घोषवाक्याखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
आंदोलनात घोषणाबाजी करत सामना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दुबईत आज (14 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होत असताना मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचं आंदोलन सुरु आहे. “माझं कुंकू, माझा देश” या घोषवाक्याखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
आंदोलनात घोषणाबाजी करत सामना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “अबुधाबीमध्ये सामना खेळवणे हे लोकभावनेच्या विरोधात आहे. शेकडो सैनिक हुतात्मा झाले, दहशतवादी हल्ल्यांत निरपराधांचा बळी गेला, आणि आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाते, हे जनतेचा विश्वासघात आहे,” अशी टीका राऊतांनी केली.
आंदोलनात घोषणाबाजी करत सामना रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “अबुधाबीमध्ये सामना खेळवणे हे लोकभावनेच्या विरोधात आहे. शेकडो सैनिक हुतात्मा झाले, दहशतवादी हल्ल्यांत निरपराधांचा बळी गेला, आणि आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाते, हे जनतेचा विश्वासघात आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.