Thackeray Meets CM Fadnavis
Thackeray Meets CM Fadnavis

आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी ठाकरे आग्रही?

आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी ठाकरे आग्रही आहेत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. पुढच्या दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होईल. तसेच विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान सत्ता स्थापनेनंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. मात्र, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय निर्णय होईल? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विरोधी पक्षनेतेपदाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे आग्रही आहेत. आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याची माहिती LOKशाही मराठीला सुत्रांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारं संख्याबळ महाविकास आघाडीमधील एकाही पक्षाकडे नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मविआतील एकाही पक्षाकडे २९ आमदार नाहीत. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही एका पक्षाकडे २९ चे संख्याबळ असणं आवश्यक आहे.

लोकशाही मराठीने विधानसभा अध्यक्ष यांची मुलाखत घेतली असताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

महाराष्ट्र विधानसभेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय: नार्वेकर

महाराष्ट्राच्या विधानसभेला अद्याप विरोधी पक्षनेता मिळाला नाही. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नियमानुसार, प्रथा-परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही. अर्ज आल्यानंतर याबाबत विचार केला जाईल. अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com