ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज एसीबी कार्यालयात चौकशी

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची आज एसीबी कार्यालयात चौकशी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे ठाकरे गटाचे विदर्भातील एकमेव आमदार नितिन देशमुख यांच्याविरुद्ध अमरावतीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल आहे.

सुरज दहाट, अमरावती

आमदार नितीन देशमुख यांच्याकड़ं कंपनी, कारखाने, यासह अनेक शेत-जमीन असल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे. त्यामुळे संपत्तीची उघड चौकशी साठी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस आमदार नितीन देशमुख यांना बजावली आहेत.त्यामुळे देशमुख हे आज सकाळी ११वाजता या चौकशीला उपस्थित राहणार असून त्यांच बयान व चौकशी एसीबी करणार आहे.

या दरम्यान एसीबी कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे हजारो शिवसैनिक जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अमरावतीत एसीबी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.चौकशी दरम्यान आमदार नितीन देशमुख यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com