ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबीकडून चौकशी

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबीकडून चौकशी

आज ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची चौकशी करणार आहे. अलिबाग येथे आमदार साळवी यांची चौकशी होणार आहे.

आज ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची चौकशी करणार आहे. अलिबाग येथे आमदार साळवी यांची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ते अलिबागला रवाना झाले आहेत. यामुळे रत्नागिरीत काही ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन केले.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी ठपका ठेवला. बेहिशेबी मालमत्तेसह मनी लाँड्रींग प्रकरणात बड्या नेत्यांना अटक करण्यात आली. या चौकशीसाठी आमदार साळवी यांना एसीबीने नोटीस बजावली होती. मात्र ही कारवाई म्हणजे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप आमदार साळवी यांनी केला.

साळवी म्हणाले की, , मी मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्यानेच मला नोटीस बजावण्यात आली. मला नोटीस बजावण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असून हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com