ताज्या बातम्या
Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार! उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तयारीला वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात विभागप्रमुख, शाखाप्रमुख ते उपशाखाप्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून हा मेळावा वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
