Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा...

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा...

मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा

  • आदित्य ठाकरे मतदार याद्यांतील घोळाबद्दल भूमिका मांडणार

  • वरळीत संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन.

मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मेळाव्यात विभागप्रमुख, शाखाप्रमुख ते उपशाखाप्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे.

31 जानेवारीपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या नियोजनाबाबत मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील. या मेळाव्यासाठी पुरुष आणि महिला पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय विश्वाचेही लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारे काय तयारी करावी, मतदार याद्यांबाबत कोणती खबरदारी घ्यायची, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती कशी करायची आणि मतदारांना आवश्यक सहकार्य कसे करायचे याबाबत खुद्द उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com