ठाकरेंची मुंबई महापालिका निवडणुकांसाठी दमदार फिल्डिंग, काय आहे प्लानिंग?
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देणार आहेत. 26, 27,28 आणि 29 डिसेंबरला विधानसभा निहाय बैठका होणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची ‘शिव सर्वेक्षण यात्रा’
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल उद्धव ठाकरे यांना दिला असून, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे.
'मातोश्री'वर बैठकांचा धडाका
26 डिसेंबर - बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा
27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा
28 डिसेंबर -मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द - शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
29 डिसेंबर - धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा