ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दिवा येथे पार पडला. यावेळी शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे.दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री आणि रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत.
तसेच दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटी देणार तसेच ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

