SSC Result Update : दहावीचा निकाल जाहीर! यंदाही कोकण विभागाने मारली बाजी, तर सर्वात कमी निकाल...
यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकतील. राज्यातील एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वीची परीक्षा दिली होती.
त्यात एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एकूण 285 विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. राज्यात दहावी परीक्षेचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. ज्यात कोकण विभाग सर्वात अव्वल स्थानी आलं आहे, तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकाल 1.71 टक्केने कमी आहे.
त्याचसोबत मुलींची उत्तीर्णची टक्केवारी 96.14 आहे, तर मुलांची उत्तीर्णची टक्केवारी 92.31 इतकी आहे. एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती त्यापैकी 24 विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यंदा बोर्ड परिक्षेदरम्यान राज्याभरात जोरदार कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले होते.
दहावीचा परीक्षेचा निकाल 94.10 टक्के
नऊ विभागीय मंडळ
कोकण 98.82
पुणे 94.81
नागपूर 90.78
छत्रपती संभाजीनगर 92.82
मुंबई 95.84
कोल्हापूर 96.87
अमरावती 92.95
नाशिक 93.04
लातूर 92.77
एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
पुणे 13
नागपूर 3
संभाजी नगर 40
मुंबई 8
कोल्हापूर 12
अमरावती 11
नाशिक 2
लातूर 113
कोकण 9
285 विद्यार्थ्यांना मिळाले 35 टक्के गुण
विभागनिहाय आकडेवारी
पुणे 59
नागपूर 63
संभाजी नगर 28
मुंबई 67
कोल्हापूर 13
अमरावती 28
नाशिक 9
लातूर 18
कोकण 0