ताज्या बातम्या
Pune Crime : पुण्यात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक; आरोपींची काढली धिंड, नेमंक प्रकरण काय?
पुणे गुन्हा: बिबवेवाडीतील गोळीबाराच्या आरोपींना अटक; आरोपींची धिंड काढली.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील गोळीबाराची घटना घडली होती. 28 वर्षीय तरुणावर आरोपींनी भरदिवसा गोळीबार केला होता. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून रुग्णलयात उपाचार सुरु होते. ही घटना भरदिवसा घडल्यानंतर परिसरात दहशत माजली होती. यादरम्यान हल्लेखोर घटना स्थळावरुन पळून गेले होते. आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सनी जाधव टोळीवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल केला. गोळीबार केलेल्या ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे.
