Dadar Kabutar khana : दादर कबुतरखान्यावर BMC ची ताडपत्री टाकत कारवाई; स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई लांबणीवर

मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे एक पथक शुक्रवारी रात्री त्याठिकाणी आले होते. मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर ही कारवाई लांबणीवर पडली आहे.
Published by :
Prachi Nate

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे एक पथक शुक्रवारी रात्री त्याठिकाणी आले होते. असं असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला तिथल्या स्थानिक नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

या सगळ्या प्रकारानंतर आता मुंबई महानगरपालिका अधिक आक्रमक झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यानंतर शनिवारी महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबूतरखाना बंद केला आहे. तसेच कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यास 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला होता.

स्थानिक नागरिकांनी आणखी तीव्र होत यासगळ्या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवर पडली आहे. स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या असून जाळी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका या सगळ्या गोष्टी हटवून कबुतरखान्यावर कधी तोडक कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com