Mumbai Ganpati Aagman 2025 : मुंबईत बाप्पाच्या आगमनाची धडाक्यात सुरुवात! खेतवाडी, चिंतामणी, गिरगावच्या राजासह इतर आगमन सोहळ्यांची तारीख ठरली; जाणून घ्या...

Mumbai Ganpati Aagman 2025 : मुंबईत बाप्पाच्या आगमनाची धडाक्यात सुरुवात! खेतवाडी, चिंतामणी, गिरगावच्या राजासह इतर आगमन सोहळ्यांची तारीख ठरली; जाणून घ्या...

मुंबईतील काही प्रमुख गणपती मंडळांच्या आगमन सोहळ्याची तारीख ठरली असून आज रविवार 3 ऑगस्टपासून ते 23 ऑगस्टपर्यंत मुंबईतील काही प्रमुख गणपती मंडळांचा आगमन सोहळा पार पडणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना सध्या सगळीकडेच तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली असून मुंबईकरांना ओढ लागली आहे, ती मुंबईतील काही प्रमुख गणपती मंडळांच्या आगमन सोहळ्याची. आज रविवार 3 ऑगस्टपासून मुंबईतील अनेक गणेश मंडळांचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पार पडणार आहे.

गणेश चतुर्थीच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाच्या मूर्तींचे आगमन होईल. 3 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत मुंबईतील काही प्रमुख गणपती मंडळांच्या आगमन सोहळ्याची तारीख ठरली असून मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दरम्यान जाणून घ्या मुंबईतील कोणत्या राजाचा आगमन सोहळा कोणत्या तारखेला पार पडणार आहे.

3 ऑगस्ट 2025

  • काळाचौकीचा महागणपती

  • फोर्टचा राजा

  • खेतवाडीचा राजा

  • परळचा मोरया

  • धारावीचा सुखकर्ता

  • मुंबईचा मोरया

  • कुर्ल्याचा महाराजा

  • सुंदरबागचा राजा

10 ऑगस्ट 2025

  • मुंबईचा सम्राट (खेतवाडी)

  • मुंबईचा महाराजा (खेतवाडी)

  • अखिल चंदनवाडी

  • परळचा महाराजा

  • करीरोडचा राजा

  • खेतवाडीचा विघ्नहर्ता

  • परळचा सम्राट

  • माझगावचा मोरया

  • खेतवाडीचा चिंतामणी

  • ताडदेवचा राजा

15 ऑगस्ट 2025

  • खेतवाडीचा लंबोदर

  • मुंबईचा विघ्नहर्ता

  • हुकमिल लेनचा राजा

  • मुंबईचा लंबोदर

  • मुंबईचा इच्छापूर्ती

  • घाटकोपरचा चिंतामणी

  • फोर्टचा लाडका

  • मुंबईचा विघ्नहर्ता अँटॉपहिल

  • परळचा लंबोदर

17 ऑगस्ट 2025

  • चिंचपोकळीचा चिंतामणी

  • परळचा राजा

  • उमरखाडीचा राजा

  • गिरगावचा राजा

  • लोअर परळचा लाडका

  • मुंबादेवीचा गणराज

  • खेतवाडीचा महाराजा

  • कुलाब्याचा लाडका

  • बाप्पा खेतवाडीचा

  • अँटॉपहिलचा महाराजा

  • सायनचा इच्छापूर्ती

  • दादरचा विघ्नहर्ता

23 ऑगस्ट 2025

  • माटुंग्याचा मोरया

  • चेंबूरचा चिंतामणी

  • चांदिवलीचा राजा

  • धारावीचा सम्राट

  • सायनचा सुखकर्ता

  • काजूपाड्याचा महाराजा

  • घाटकोपरचा एकदंत

  • चेंबूरचा सुखकर्ता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com