Chinchpokli Cha Chintamani 2025 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दिमाखात आगमन! प्रथम दर्शन समोर; रस्त्यांवर गर्दीचा महापूर

Chinchpokli Cha Chintamani 2025 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दिमाखात आगमन! प्रथम दर्शन समोर; रस्त्यांवर गर्दीचा महापूर

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा सुरु झाला असून चिंतामणीचं प्रथम दर्शन समोर आलं आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईतील गणेशोत्सवाची धूम यंदा अधिकच रंगणार आहे. येत्या 22 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होत असून, त्याआधीच मुंबईतील सर्वात लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आज बाप्पाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.

मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे कळविण्यात आले की,आज 17 ऑगस्ट 2025 रोजी परळ येथील कलागंधा आर्ट्समधून चिंचपोकळीचा चिंतामणीचा भव्य आगमन सोहळा पार पडणार आहे. तब्बल 105 वर्षांचा वारसा असलेल्या या मंडळाच्या गणेशमूर्तीची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे. 1920 मध्ये स्थापन झालेले हे मंडळ मुंबईच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक मानले जाते.

भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था 17 ऑगस्टपासूनच करण्यात आली आहे. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 अशी असेल. दरवर्षी हजारो भाविक परळ परिसरात या सोहळ्याचे साक्षीदार होतात. वाहतुकीच्या अडचणी टाळण्यासाठी आगाऊच मूर्ती मंडपात आणली जाते.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला यंदा अधिकृतपणे ‘राज्य उत्सव’ घोषित केले आहे. भाजप आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत ही मागणी केली होती. त्यामुळे यंदाचा चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा अधिक ऐतिहासिक ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com