Mahabaleshwar Temperature
Mahabaleshwar TemperatureTeam Lokshahi

राज्यात थंडीचं आगमन, अनेक ठिकाणी तापमान घसरलं; महाबळेश्वर 11 अंशांवर

परतीचा पाऊल लांबल्याने यंदा राज्यात थंडीचं आगमनही लांबलं होतं. मात्र आता राज्यात थंडीचं आगमन झालंय अनेक ठिकाणी तापमान घसरलं असून महाबळेश्वरमध्ये तापमान 11 अंशांवर घसरलंय.

प्रशांत जगताप : सातारा | परतीचा पाऊल लांबल्याने यंदा राज्यात थंडीचं आगमनही लांबलं होतं. मात्र आता राज्यात थंडीचं आगमन झालंय अनेक ठिकाणी तापमान घसरलं असून महाबळेश्वरमध्ये तापमान 11 अंशांवर घसरलंय. तर वेण्णालेकमध्ये तापमान 8 अंशांवर आलंय. महाबळेश्वरमध्ये थंडीचं आगमन झालं की, पर्यटकांची पावलं तिकडं वळायला लागतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय.

Mahabaleshwar Temperature
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्याने शेतकरी वर्गात सध्या आनंदाचं वातावरण पाहा यला मिळतयं. तर दुसरीकडे सर्वसामान्य लाकांच्या मफलर, कानटोप्या, यांसह गरम कपडे बाहेर आले आहेत. तर जागोजागी शेकोट्या पेटल्याचं पहायला मिळतंय. तर विविध भागांवर धुक्याची दाट चादर पसल्याचं पहायला मिळतयं.

ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस पडला, तर नोव्हेंबरपासून थंडीच्या ऋतूला सुरुवात झाली. उत्तरेतील शीत वाऱ्यांनी पहिल्याच दिवशी रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. मात्र, त्यानंतर हवामानात वेगाने बदल झाले. त्यानुसार तापमानात चढउतार नोंदवले गेले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com