Aman Jaiswal: 'धरतीपुत्र नंदनी'च्या कलाकाराचा करूण अंत, अमनची भरभरून जगण्याची इच्छा अपूर्णच, शेवटची पोस्ट व्हायरल

Aman Jaiswal: 'धरतीपुत्र नंदनी'च्या कलाकाराचा करूण अंत, अमनची भरभरून जगण्याची इच्छा अपूर्णच, शेवटची पोस्ट व्हायरल

'धरतीपुत्र नंदिनी' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याच अपघातात निधन. २३ वर्षीय अभिनेत्यांची शेवटची पोस्ट व्हायरल झाली आहे. चाहते सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

हिंदी टेलिव्हिजन विश्वातून शुक्रवारी १७ जानेवारी रोजी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'धरतीपुत्र नंदिनी' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेल्या अमन जयस्वाल यांचा रस्ते अपघातात मुत्यू झाला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याला आपला जीव गमवावा लागला.

'धरतीपुत्र नंदिनी'चे लेखक धीरज मिश्रा यांनी अमनच्या निधनाची बातमी दिली. अमन एका ठिकाणी ऑडिशनला जात असताना त्याचा अपघात झाला. अपघातादरम्यान अमनला कामा रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला.

नवीन सकारात्मकता ऊर्जा घेऊन या वर्षाची सुरुवात केली, मात्र वर्षातील पहिला महिनाच त्याच्यासाठी अखेरचा ठरला. अमनच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर चाहते दुःख व्यक्त करत आहेत.

काय होती अमनची शेवटची पोस्ट

अमनचे इन्स्टाग्रामवर @aman_jazz या नावाने अकाउंट आहे . त्यांने ३१ डिसेंबरला सोशल मीडियावर पोस्ट केली. 'नवीन स्वप्ने आणि अनंत शक्यतांसह 2025 मध्ये पाऊल टाकत आहे', हा कॅप्शन असलेला व्हिडिओ आहे. अमनच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अमनचा जन्म बलिया याठिकाणी झाला. त्याने मॉडेल म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'धरतीपुत्र नंदिनी' या मालिकेने त्याला घराघरात पोहोचवले. अभिनेत्याने 'पुण्यश्लोक अहिल्यबाई' या मालिकेत 'यशवंतराव फणसे' ही भूमिका साकारली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com