विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट पलटली; बोटीतील 12 पैकी 11 जण सुखरुप

विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट पलटली; बोटीतील 12 पैकी 11 जण सुखरुप

विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट पलटली
Published by :
Siddhi Naringrekar

संदिप गायकवाड, विरार

विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट पलटल्याची घटना घडली आहे. काल रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. अर्नाळा जेटी ते अर्नाळा किल्ला अशी ही बोट अर्नाळा जेटी वरून निघाली होती. समुद्राच्या मध्य भागी बोट अचानक पलटी झाली आणि ही दुर्घटना घडली आहे.

या बोटीत एकूण 12 व्यक्ती होते त्यापैकी 11 जण सुखरूप असून एक व्यक्ती मात्र बेपत्ता आहे. अर्नाळा सागरी पोलीस, मेरीटाईन बोर्ड, स्थानिक मच्छीमार आणी हवाई पाहणी यांच्या मदतीने बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com