Lakhimpur Rape Case
Lakhimpur Rape CaseTeam Lokshahi

उत्तर प्रदेशातील दोन मुलींचे मृतदेह शेतामध्ये झाडावर आढळले; शरीरावर एकही जखम नसल्याचं पोलिसांचं मत!

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लालपूर माजरा तमोली गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत हे दोन मृतदेह आढळून आले.

उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खेरी येथे बुधवारी, १४ सप्टेंबर २०२२ दोन दलित किशोरवयीन बहिणी उसाच्या शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या असं पोलिसांनी सांगितलं. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लालपूर माजरा तमोली गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत हे दोन मृतदेह आढळून आले. लखनौ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, 'त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत आणि मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.'

मुलींच्या कुटुंबीयांनी मात्र त्यांची हत्या केल्याचा आरोप केला असून शेजारील गावातील तीन तरुणांनी त्यांचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

"लखीमपूर खेरी येथील गावाबाहेरील शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहांवर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. इतर गोष्टी पोस्टमार्टमनंतर समजणार आहेत. आम्ही तपासाला गती देण्याचा प्रयत्न करू."

Lokshahi
www.lokshahi.com