ताज्या बातम्या
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, दोन्ही याचिका फेटाळल्या
मुंबई उच्च न्यायालयाकडून कृषी साहित्य खरेदीबाबत राज्य शासनाच्या निर्णयास दुजोरा दिला आहे. धनंजय मुंडेंवरील दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून कृषी साहित्य खरेदीबाबत, राज्य शासनाच्या निर्णयास दुजोरा दिला आहे. धनंजय मुंडेंच्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ता तुषार पडगिलवार यांस एक लाखांचा दंड ठोटावण्यात आला आहे. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री कार्यकाळात कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत.