Cannes Film Festival 2025 : सातासमुद्रापार मराठीचा डंका, यंदा 'या 4 मराठी चित्रपटांची कान्ससाठी निवड
महामंडळामार्फत सन 2016 पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भूरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे.
या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.
सातासमुद्रापार मराठीचा डंका, फ्रान्समध्ये येत्या 14 ते 22 मे 2025 या कालावधीत कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. ‘स्थळ', ‘जुनं फर्निचर’, ‘खालिद का शिवाजी‘, ‘स्नो फ्लॉवर’ या 4 चित्रपटांची कान्ससाठी निवड करण्यात आली असून फ्रान्समध्ये 14 ते 22 मेपर्यंत आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव रंगणार आहे.