Nana Patole
Nana Patole Team Lokshahi

नाना पटोले यांच्या समोरुन मांजर आडवी गेली, पुणे शहरध्यक्षांनी काय केले? पाहा व्हिडिओ

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आज काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने कसबा, चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करण्यासाठी नाना पटोले पुणे येथील काँग्रेस भवनात आले होते. काँग्रेस भवनाच्या गेटवर एक मांजर आली होती. ही मांजर नेमकी नाना पटोले बाहेर पडत असताना त्यांच्या मार्गावर आली. नाना पटोले यांच्या समोरुन मांजर आडवी जाऊ नये यासाठी आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदे यांनी तिला तिथून हाकलून लावलं.

हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विज्ञानाच्या युगात अनेक जण अजून अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेले नाही असे या व्हि़डिओतून दिसून आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com