अबब... कोंबडीने दिलं भलं मोठं अंडं

अबब... कोंबडीने दिलं भलं मोठं अंडं

आपण आजपर्यंत दीड ते 2 सेंटीमीटरचं कोंबडीचं अंडं पाहिलं. मात्र सोलापूरमधील बाळे परीसरात कोंबडीने साडेतीन सेंटींमीटरचं अंडं दिलंय.
Published by  :
shweta walge

दशरथ दंदाडे ,सोलापूर: आपण आजपर्यंत दीड ते 2 सेंटीमीटरचं कोंबडीचं अंडं पाहिलं. मात्र सोलापूरमधील बाळे परीसरात कोंबडीने साडेतीन सेंटींमीटरचं अंडं दिलंय. एवढं मोठं अंडं पाहून कोंबडी मालकाला धक्काच बसला. हे अंडं पाहण्यासाठी दूरदूरवरून पोल्ट्रीचालकांसह अनेक लोक गर्दी करत आहेत. कोंबडी मालक विविध ठिकाणी जाऊन कोंबड्याबाबत चौकशी,अभ्यास करत आहेत.

सोलापूर बार्शी रोडवर असलेल्या मेंगाणे नगर येथील कोंबडीने साडे तीन इंचाचे अंडे दिले आहे. एवढा मोठा अंडा पाहून कोंबडीचे मालक दशरथ दंदाडे यांना धक्काच बसला आहे. नेहमीप्रमाणे 2 सेंटीमीटरचे अंडे देणाऱ्या कोंबडीने साडेतीन इंचाचा अंडा दिला आहे.

हा अंडा पाहण्यासाठी दूरदूरवरून पोल्ट्रीचालक येत आहेत. अधिक चौकशी करत आहेत.कोंबडीचे मालक दशरथ हे देखील विविध ठिकाणी जाऊन कोंबड्याबाबत चौकशी व अभ्यास करत आहेत.यापुढे नेहमी असा मोठा अंडा कशा प्रकारे देईल ,याबाबत अभ्यास केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com