Sanjay Raut On CM Devendra Fadnavis : "मुख्यमंत्री फक्त हवा भरलेला फुगा..." राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

राऊतांचा भाजपवर हल्लाबोल: 'मुख्यमंत्री फक्त हवा भरलेला फुगा', फडणवीसांवर टीका
Published by :
Riddhi Vanne

Sanjay Raut On CM Devendra Fadnavis : पुण्याच्या दौंडमधील यवतमध्ये चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता. यावरून यवतसह दौंड तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. यादरम्यान काल भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप तसेच किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्‌गुरु स्वामी हेमांगी सखीजी या तिघांनी या ठिकाणी येऊन भाषणे केली. त्यांची पाठ फिरताच यवत मध्ये आज सकाळी दंगल उसळली. या पाश्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

त्यावेळी ते म्हणाले की, "दोन आमदार भाजपचे आले आले.. दंगल पेटवून गेले नवा हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे हे यवतमध्ये येतात दौंड मध्ये येतात आणि दंगल करून जातात काय करत आहे तुमचा जन सुरक्षा कायदा भांडी घासत आहे.. का का कुठल्या कोठ्यावर नाचत आहे. देवेंद्र फडणवीस हे अपयशी मुख्यमंत्री त्यांचा फक्त फुगा फुगवला आहे जसे नरेंद्र मोदी यांची हवा भरले फुग्यात आहे कसे देवेंद्र फडणवीस यांच्यात हवा भरली आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com