एकनाथजींनी मंत्रिमंडळातच राहावं, फडणवीसांची विनंती शिंदे मान्य करतील का?
अखेर संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील यात आता कोणतीही शंका नाही. भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज ११ दिवस पूर्ण होत आहेत. अखेरीस महायुतीकडून सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. महायुतीतील प्रमुख नेते यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राजभवनात दाखल झाले. त्यांनी राज्यपालांकडे समर्थनाचे पत्र सुपुर्द करण्यात आलं आहे. यावेळी आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, प्रविण दरेकर तसेच महायुतीतील अन्य महत्त्वाचे नेते राजभवनावर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहतील याविषयी सपेन्स?
राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबंधित केलं. मुंबईतील आझाद मैदानावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी कार्यक्रम होणार असल्याचं जाहीर केलं. तसेच शपथविधी सोहळ्यात कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेईल ही माहिती सायंकाळी जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं ही विनंती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आम्ही तिघे मिळून एकत्र सरकार चालवणार असल्यांचं त्यांनी म्हटलं आहे. महायुतीकडून सर्व निर्णय एकत्रित घेण्यात येतील असं ही त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केल्याने आता सपेन्स निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे फडणवीस यांनी केलेली विनंती मान्य करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.