Chandrashekhar Bawankule : 'खासदार चुकीच्या याद्यांवर...' उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बाबनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत.

  • याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बाबनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बाबनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, ते "भाजपवर टीका करत आहेत, ते निवडणूक आयोगावर टीका करत नाही, एकटीच खासदार निवडून आल्यावर त्यांनी पत्रकार परिषद का नाही घेतली. उद्धव ठाकरे यांनी खासदार निवडून आले ते चुकीच्या मतदार यादीवर निवडून आले, मतचोरी करून निवडून आले, ते का बोलत नाही. याच मानसिकतेत उद्धव ठाकरे जर राहिले तर पुढचे 25 वर्ष महाविकास आघाडी कधीही जनतेत निवडून येणार नाही."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com