पुणे हिट अँन्ड रन प्रकरणातील आरोपीची प्रकृती बिघडली

पुणे हिट अँन्ड रन प्रकरणातील आरोपीची प्रकृती बिघडली

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाली आहे. डॉ. श्रीहरी हरनोर आणि अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून डॉक्टरांना अटक करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर आता आरोपीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. ससूनचा डॉक्टर श्रीहरी हळनोरची प्रकृती बिघडली आहे. हळनोरला आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हळनोर पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला सध्या इन्फेक्शनचा त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com