Devendra Fadnavis : देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात होणार!  देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Devendra Fadnavis : देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात होणार! देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

आज महत्त्वपूर्ण करार राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये होणार आहे. या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईमध्ये येणार आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आज महत्त्वपूर्ण करार राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये होणार आहे. या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईमध्ये येणार आहेत. त्यामुळे मुंबईसाठी कोणती मोठी घोषणा होणार याकडे लक्ष आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. देवेंद्र फडणवीसमायक्रोसॉफ्टसोबत होत असलेल्या करारामुळे मुंबईमध्ये येत असल्याने मुंबईसाठी मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. कोणत्या संदर्भातील मात्र हा करार आहे याची स्पष्टता आलेली नाही.

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात होणार!

दरम्यान, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता, 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आवश्यक जागेची निश्चिती करण्यात यावी. जयगड, आंग्रे, रेडी आणि विजयदुर्ग बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करावा. या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. तसेच, वाढवण बंदर ते नाशिकपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रभावित क्षेत्रांचा विचार करून विकासाचे नियोजन करावे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com