Jyoti Waghmare Phone To Collector : "राजकारण नंतर..."; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनेच सुनावले ज्योती वाघमारेंना खडेबोल

Jyoti Waghmare Phone To Collector : अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, ज्योती वाघमारे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर खडसावणीचा व्हिडिओ व्हायरल.

Jyoti Waghmare VS Solapur District Collector : महाराष्ट्रात पावसाने चांगले थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास पावसाने हिरावून घेतले. अक्षर:शा शेतकऱ्यांचे संसार पाण्याखाली गेल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे या शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत चांगलेच खडसावले आहे.

सोलापूरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतर शेतजमीन पाण्याखाली गेली. अनेक राजकीय नेते याठिकाणी पाहणीसाठी गेले होते . राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सोलापूरात पाहणी केली. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे या सुद्धा सोलापूरात पाकणी याठिकाणी पाहणीसाठी गेल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्यामधील फोनवरील संभाषण आता व्हायरल झाले आहे.

संभाषणात ज्योती वाघमारे म्हणाल्या की, जेवनाचे कीट हे पूर्ण पाठवा. नागरिकांची संख्या 3000 असताना तुम्ही फक्त 200 कीट तुम्ही कसे देतात. त्यावर संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ज्योती वाघमारे यांना चांगलेच सुनावले. तुमचे हे राजकारण बंद करा असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com