HSC Exam : शिक्षण खात्यानं बारावी परीक्षेत केला मोठा बदल; वाचा
बारावीचा वार्षिक पेपर ८० गुणांचा असणार आहे. तर २० गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील तीन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हा बदल शिक्षण खात्याने केला आहे.
बारावीची परीक्षा १०० गुणांची घेतली जाते. मात्र, आता शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या तीन चाचणी परीक्षांमध्येही चांगले गुण घ्यावे लागणार आहेत. तीन परीक्षांपैकी दोन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जाणार आहेत.
तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना मूल्यमापनाद्वारे दिल्या जाणाऱ्या २० गुणांसाठीही चांगली तयारी करावी लागणार आहे. विद्यार्थ्याने प्रोजेक्ट कशाप्रकारे तयार केला आहे. यासाठी पाच गुण तर तोंडी प्रश्नांसाठी पाच गुण दिले जाणार असून, हे गुण देखील परीक्षेपूर्वी अपलोड केले जाणार आहेत. परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे दहा गुण ऑनलाईनद्वारे देण्यात येणारे आहेत.