रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रा.पं.चा निवडणूकांचे बिगुल वाजले

रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रा.पं.चा निवडणूकांचे बिगुल वाजले

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे.

निसार शेख, रत्नागिरी

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे . त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे . त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल , अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू . पी . एस . मदान यांनी आज केली.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८;नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील . नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील . नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल . नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल .

मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल . तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल . मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल .रत्नागिरी जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींची धुळवड उडणार आहे . जिल्ह्यात मंडणगडमध्ये १४ , दापोली ३० , खेड १० , चिपळूण 32, गुहागर २० , संगमेश्वर ३५ , रत्नागिरी २८ , लांजा १८ आणि राजापूरमधील ३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे . यात सर्वाधिक लक्ष मंडणगड - खेड - दापोली आणि रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदार संघावर राहणार आहे .

Lokshahi Marathi
www.lokshahi.com