ताज्या बातम्या
Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी? अजित पवार स्पष्टच बोलले
बारामतीतल्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडते आहे. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून, अजित पवार, शरद पवार आणि चंद्रराव तावरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आज बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडते आहे. आज सकाळीच खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, रंजन तावरे यांनी निवडणुकीसाठी मतदान केलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदान होणार असून, 24 जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकीसाठी अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल, तर शरद पवारांच्या पक्षाचं बळीराजा पॅनल यांच्यासह अनेक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्यात 37 गावातील 68 बुथ केंद्रावर मतदान पार पडत आहे. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात असून, अजित पवार, शरद पवार आणि चंद्रराव तावरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.