Jalna Copy Case: जालन्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावीचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटला

जालन्यात दहावीच्या मराठी पेपर फुटल्याने कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. बदनापुर आणि मंठा तालुक्यात पेपर 20-30 रुपयांत झेरॉक्स करून वाटला गेला.
Published by :
Prachi Nate

देशासह राज्यामध्ये सर्वत्र परीक्षेचे सत्र सुरू झाले असून बारावीची परीक्षा पाठोपाठ आज दहावीच्या परीक्षेला देखील सुरुवात झाली आहे आज दहावीचा मराठीचा पहिला पेपर असून जालन्यात दहावीचा पहिलाच पेपर फुटला आहे. त्यामुळे जालन्यातील कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे.

दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापुर आणि मंठा तालुक्यात पेपर फुटला आहे. बदनापुरमध्ये चक्क 20 ते 30 रुपयांत पेपरच्या झेरॉक्स काढून त्या वाटण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका वाटण्यासाठी मुलांचा घोळका सेंटरबाहेर पाहायला मिळत होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com