Bachchu Kadu
Bachchu KaduTeam Lokshahi

आम्ही सगळ्यांनी नवस केला होता म्हणून सरकार आलं, बच्चू कडू यांच मोठ विधान

२१नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहे यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व आमदार जात आहे मी पण जाणार आहे, तर आम्ही सगळ्यांनी नवस केला होता म्हणून सरकार आलं असं मोठं विधान बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पडेल असं विधान केल्यानंतर यावर बच्चू कडू यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, हे सगळं येड बनवण्याच काम आहे आम्ही पण खर म्हणतं होतो की, सरकार पडलं पाहिजे ह्या सगळ्या भूलथापा आहे. आमदार फुटले नाही पाहिजे म्हणून असे विधान संजय राऊत करत आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

Bachchu Kadu
ठाकरे गटाला हायकोर्टाचा झटका, निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली

दरम्यान, दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे, सरकार पडलं तरी बेहतर पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळेस दिली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com