ताज्या बातम्या
सरकारचं शिष्टमंडळ दुपारी अंतरवाली सराटीत जाणार; मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा समाज अंतरवालीत येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतलं आहेत.आज मनोज जरांगे पाटील यांची दहा वाजता पत्रकार परिषद आहे. यात जरांगे पाटील उपोषण सोडतात का? किंवा आंदोलनाची दिशा बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज सरकारचं शिष्टमंडळ दुपारी अंतरवाली सराटीत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शंभूराज देसाईंच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती मिळणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये 6 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.