राज्यात सरकार पडण्याची हवा - बाळासाहेब थोरात

राज्यात सरकार पडण्याची हवा - बाळासाहेब थोरात

राज्यात सरकार पडण्याची हवा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी संगितले आहे.

आदेश वाकळे, संगमनेर

राज्यात सरकार पडण्याची हवा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी संगितले आहे. तसेच भारत जोडो यात्रा ही तरुण वर्ग ,बेरोजगार ,महागाईच्या विरोधात निघालेली आहे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताचे संविधान वाचवण्याचे व भारत जोडो यात्रेला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे ही यात्रा काँग्रेसचे नसून सर्वसमावेशक भारत जोडो यात्रा आहे येणाऱ्या काळामध्ये देशाला एक दिशा देणारे काळ ठरेल असे त्यांनी थोरात यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान करणे व निवडणुकीच्या काळात महापुरुषांविषयी आम्हाला खूप आदर आहे अशा पद्धतीचे वर्तन करणे व निवडणूक गेल्यानंतर महापुरुषांविषयी काहीतरी बोलणे हा काही पक्षांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले राज्यपाल पद खूप आदरणीय पद आहे पण या पदाच्या माध्यमातून थोर पुरुषांविषयी काहीतरी बोलले हा अतिशय निंगनीय आहे. राज्यातील शिंदे सरकार कधीही कोसळे त्यासाठी सध्या देव देव चालू असल्याचे आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे

Lokshahi Marathi
www.lokshahi.com