ताज्या बातम्या
Solapur : सोलापूरच्या बार्शीतील मराठा समाजाचं उपोषण स्थगित
मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित केलं आहे.
वसिम अत्तर, सोलापूर
मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती केली होती.
याच पार्श्वभूमीवर आता सोलापूरच्या बार्शीतील मराठा समाजानं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्यात आल्यानंतर बार्शीतील उपोषण स्थगित करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
बार्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसापासून आनंद काशीद यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. आता हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून बार्शीत उपोषण सुरू केलं होतं. उपोषणकर्त्यांनी फळांचा रस घेऊन उपोषण सोडलं आहे.