पुण्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी गेली दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहेत.
पुण्यात यंदा डीजे बंद असल्यामुळे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला पुणेकरांनी निरोप दिला आहे.
पुण्यात मानाच्या पहिला कसबा गणपतीचे 3 वाजून 47 मिनिटांनी विसर्जन झाले. यावेळी भक्तांनी मोठ्या जयघोषाने बाप्पाला निरोप दिला.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन नटेश्वर घाट येथे कृत्रिम हौदामध्ये झाले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कसबा गणपतीचे लवकर विसर्जन झाले.