लालबागच्या लाडक्या राजाचं आज विसर्जन, अशी सुरु आहे विसर्जनाची तयारी

लालबागच्या लाडक्या राजाचं आज विसर्जन, अशी सुरु आहे विसर्जनाची तयारी

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २० हजार पोलिसांना विसर्जन स्थळ व मार्गिकांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा भव्य मिरवणूक काढत, वाजत गाजत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाईल.

लालबागचा राजा भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक, नागपाडा, सुतार गल्ली, माधवबाग, ऑपेरा हाऊस या मार्गे लालबागचा राजा गिरगाव चौपाटी असा प्रवास करत विसर्जनासाठी दाखल होतो.

गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. लालबागच्या राजासह मुंबईच्या प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी घराबाहेर पडतात. वेगवेगळ्या ठिकाणांहून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी उसळते.

लालबागच्या लाडक्या राजाचं आज विसर्जन, अशी सुरु आहे विसर्जनाची तयारी
बाप्पाच्या विसर्जनसाठी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त
Lokshahi
www.lokshahi.com