International Womens Day : स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा, तिच्या कर्तृत्वाला सलाम करणाऱ्या दिवसाचे महत्त्व

International Womens Day : स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा, तिच्या कर्तृत्वाला सलाम करणाऱ्या दिवसाचे महत्त्व

जागतिक महिला दिन: ८ मार्चला साजरा होणारा स्त्री शक्तीचा गौरव, महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळवून देण्याचा दिवस.
Published on

दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ ला महिला दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती. ८ मार्चचा हा खास दिवस महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

संपूर्ण जगभरात महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. काबाडकष्ट करून आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत महिलांनी अनेक क्षेत्रात यशाचं उंच शिखर गाठलं आहे. महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, अशा उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतर क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.

महिलांना पुरुषांप्रमाणेच समान हक्क आणि अधिकार मिळण्यासाठी या दिवसाचं विशेष महत्व असतं. महिलांमध्ये अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानेही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. समाजात महिलांविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी तसंच महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यसाठीही हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com