Eknath Shinde, Chagan Bhujbal
Eknath Shinde, Chagan BhujbalTeam Lokshahi

काळ्या दाढीवाल्याचा महाराष्ट्रावर प्रभाव तर पांढऱ्या दाढीवाल्यांचा देशभर, भुजबळांची टोलेबाजी

जीएसटीवरुन मुद्दा मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आक्रमक झाले.
Published by :
shweta walge

मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यातच जीएसटीवरुन मुद्दा मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आक्रमक झाले. पण, यावेळी त्यांनी काळ्या-पांढऱ्या दाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

विधानसभेच्या कामकाजादरम्यान जीएसटीवरुन मुद्दा मांडताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत याचा मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे तर सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

जीएसटीवरुन हल्लाबोल

अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या मात्र त्यावरही आता ५ टक्के जीएसटी लावणयात आला. तिकडे (केंद्र शासनात) जे मंजूर झाले ते इकडे (राज्यात) मंजूर करता त्यांना थोडे सांगा दरवाढ करू नका, असे भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना म्हंटले आहेत.

शाळा, अन्नधान्य आणि रुग्णालयाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं वजन वाढवलं पाहिजे. उपमुख्यमंत्री त्यांना घेऊन जा. आणि यांना सांगा की यामधील गोष्टींवर थोड काही तरी कमी करा. संपूर्ण देशाच लक्ष तुमच्याकडे लागलं आहे. तुम्ही गंभीरतेने याची दखल घ्या, असे भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com