सांगली जिल्ह्यातील उस आंदोलनाची तीव्रता वाढली अनेक ठिकाणी ऊस तोडी रोखल्या तर कारखाने बंद पाडले

सांगली जिल्ह्यातील उस आंदोलनाची तीव्रता वाढली अनेक ठिकाणी ऊस तोडी रोखल्या तर कारखाने बंद पाडले

ऊसाच्या एकरकमी एफआरपी सह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून "ऊस तोडणी बंद" आंदोलन सुरू झाले आहे.

संजय देसाई, सांगली

ऊसाच्या एकरकमी एफआरपी सह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून "ऊस तोडणी बंद" आंदोलन सुरू झाले आहे.सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.बठीक-ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस आंदोलना भडका उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उसाला एक रकमी एफ आर पी मिळावी तसेच उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी त वाहतूकदारांची सुरू असलेली फसवनुक थांबवावी त्याचबरोबर साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयाच्या अधिकचा भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती.सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली.

वाळव्याच्या हुतात्मा साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली,इस्लामपूर-वाळवा रोडवर चार बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखून धरली आहे.तर पलूस तालुक्यातल्या कुंडल या ठिकाणी संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली क्रांती साखर कारखान्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रॅक्टर धरले,यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कारखान्याचा गेट बंद केला.तसेच खानापूर तालुक्यात उदगिरी साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचे नेतृत्वाखाली बंद पाडली आहे, खानापूर येथे ट्रॅक्टरची हवा सोडून निषेध व्यक्त केला, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे,त्यामुळे एकूणच दिवसभर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाणार असून या ऊसदर आंदोलनाचा भडका ही उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com