Sambhajinagar : अंगणवाडीतील 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी दीड महिन्यापासून रखडली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील नळयोजना, किचन सेट खरेदी, कर्मचाऱ्यांची भरती व बीटबदलांमध्ये झालेल्या सुमारे ९ कोटींच्या अनियमिततेची चौकशी दीड महिन्यांपासून रखडली आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी प्रकरण

  • अंगणवाडीतील 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली

  • अनियमिततेची चौकशी दीड महिन्यांपासून रखडली

  • जिल्हा अधिकारी यांच्या कार्यकाळात घोटाळ्याचा आरोप

(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील नळयोजना, किचन सेट खरेदी, कर्मचाऱ्यांची भरती व बीटबदलांमध्ये झालेल्या सुमारे ९ कोटींच्या अनियमिततेची चौकशी दीड महिन्यांपासून रखडली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ४ सप्टेंबरला चौकशी समिती नेमली असली तरी अद्याप काम सुरू झालेले नाही. तत्कालीन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाल्याचा आरोप असून त्यांच्या पेन्शनलाही स्थगिती देण्यात आली आहे. आ. अनुराधा चव्हाण यांनी या घोटाळ्याबाबत सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com