Raj Thackeray & Narendra Modi
Raj Thackeray & Narendra ModiTeam Lokshahi

हनुमान चालिसाचा मुद्दा आता राष्ट्रीय 'राज'कारणात

मनसे पाठोपाठ हनुमान चालिसा पठणासाठी आता भाजपही आग्रही
Published on

मागील काही दिवस राज्यातील राजकीय वर्तुळात गाजत असलेला मुद्दा म्हणजे धार्मिक स्थळांवरील भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात आग्रही भुमिका घेतली. तर, महाविकासआघाडी सरकारने हे भोंगे न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करू असा थेट इशाराही राज ठाकरेंनी दिला.

आता मनसेने उपस्थित केलेला हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणच्या केंद्रस्थानी जाण्याची शक्यता आहे. केंद्र सराकारमधील सत्तेतील पक्ष म्हणजे भाजपला(BJP Goverment) केंद्रामध्ये सत्तेत येवून येत्या 26 मे रोजी 8 वर्षे पुर्ण होणार आहेत. या निमित्ताने भआजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सर्व कार्यक्रमांपैकी महत्तवाचा व लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम म्हणजे 'हनुमान चालीसा पठण'

मनसेनंतर आता भाजपही हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम हाती घेत असल्याने आता राष्ट्रीय राजकारणात हनुमान चालिसा व पर्यायाने राज ठाकरेंसह मनसेचेही महत्त्व वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com