BMC : मुंबईतील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, महापालिकेचे मोठे वक्तव्य

मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात. संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं. रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात. संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं. रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो. मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आले आहेत.

ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरवस्था झालीय.त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे या सफाई कर्माचाऱ्यांना न्याय कधी मिळणार हे देखील महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षा कडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे. यावर पालिकेने मोठं वक्तव्य केले आहे. महापालिकेचे असं म्हणणे आहे की, धोकादायक कचरा गाड्या चालवणे हा आमचा नाईलाज असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

थोडक्यात

  • मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात.

  • संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं.

  • रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com