ताज्या बातम्या
BJP News : आगामी निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली; मविआतील बड्या नेत्यांसाठी दारं खुली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली. मविआच्या बड्या नेत्यांना दारं खुली करण्यात येण्याचा निर्णय महायुतीमधील नेत्यांनी घेतला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आहे. स्थानिक पातळीवरील मविआच्या बड्या नेत्यांना दारं खुली करण्यात येण्याचा निर्णय महायुतीमधील नेत्यांनी घेतला आहे. 'भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल, त्यांना पक्षात घ्या', 'कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घ्या' असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाजपची नेतृत्वाखाली कोकण आणि ठाणे विभागाची बैठक पार पडली. यादरम्यान ठाणे व कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. या बैठकीत हा महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे. भाजपमधील नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वसई विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता वर्तावली जात आहे.