Guardian Minister
Guardian Minister

अखेर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, पालकमंत्र्यांची यादी जाहीर

महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
Published by :
Published on

अखेर महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे.

फडणवीसांकडे गडचिरोली, शिंदेंकडे मुंबई शहर आणि ठाणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत: कडे ठेवलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री असणार आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. 

धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळलं

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशात धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अखेर त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात आली  होती. तरीही बीडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: बीडचे पालकमंत्रिपद भूषवणार आहेत.

गडचिरोलीचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी का महत्त्वाचं?

गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्तांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी गृहखात्याचा महत्त्वाचा उपक्रम तत्कालीन गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी राबविला होता. यामार्फत फडणवीसांनी अनेक नक्षलवाद्यांना मुख्यप्रवाहात आणण्याचं कार्य केलं. गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून पहिला जिल्हा असल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी याआधी केलं होतं. गडचिरोलीच्या विकासासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवण्यात आले आहेत. तसेच हा जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीने सधन आहे. गडचिरोलीतील सर्वात मोठी लोहखनिजाची खाण असलेल्या सुरजागड इस्पात प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन जुलै २०२४ मध्ये केलं आहे. यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी उपक्रम राबवले आहेत.

पाहा कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं?

गडचिरोली - देवेंद्र फडणवीस

ठाणे - एकनाथ शिंदे

पुणे - अजित पवार

बीड - अजित पवार

नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे-पाटील

सांगली - चंद्रकांत पाटील

नाशिक - गिरीश महाजन

पालघर - गणेश नाईक

जळगाव- गुलाबराव पाटील

यवतमाळ- संजय राठोड

मुंबई उपनगर - आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)

रत्नागिरी - उदय सामंत

धुळे - जयकुमार रावल

जालना - पंकजा मुंडे

नांदेड - अतुल सावे

चंद्रपूर - डॉ. अशोक उईके

सातारा - शंभूराज देसाई

रायगड - आदिती तटकरे

लातूर - शिवेंद्रसिंहराजे भोसले

नंदूरबार - माणिकराव कोकाटे

सोलापूर - जयकुमार गोरे

हिंगोली - नरहरी झिरवाळ

भंडारा - संजय सावकारे

छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट

धाराशिव - प्रताप सरनाईक

बुलढाणा - मकरंद जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग - नितेश राणे

अकोला - आकाश फुंडकर

गोंदिया - बाबासाहेब पाटील

कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)

गडचिरोली - अॅड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)

वर्धा - डॉ. पंकज भोयर

परभणी - मेघना बोर्डीकर

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com