Sanjay Raut : "ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली, त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील"

Sanjay Raut : "ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली, त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील"

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार असून अजित पवार आज कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा करण्यात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, आज आम्हाला पाहायचं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होतंय का? आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातात का? कारण या दोन संकल्पावर त्यांनी मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीचा आर्थिक पाहणी अहवाल जो महाराष्ट्राचा आलेला आहे की, महाराष्ट्र कसा ओझाच्या कर्जाखाली तडफडतो आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे. त्याच्यामुळे आम्हालाही चिंता आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, राज्यकर्त्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीने सरकारी तिजोरीचा गैरवापर केला. तो इतक्या टोकाला गेलेला आहे की आता त्यांना मागे हटता येणार नाही. ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली. त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com