Mumbai Mayors List : मुंबई महापालिकेच्या आतापर्यंत कारभाराचे नेतृत्व करणारे महापौर; जाणून घ्या
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून आज, १६ जानेवारी रोजी मतमोजणी सुरू होत आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीने. राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिले जात असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी ही निवडणूक पार पडली आहे. सत्ताधारी महायुती, ठाकरे बंधूंची युती तसेच इतर पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रचाराच्या काळात आरोप-प्रत्यारोप, सभा, रॅली आणि रोड शोमुळे राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे आज जाहीर होणारे निकाल केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणावरही मोठा प्रभाव टाकणार आहेत. सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपदावर भाजप-सेना युतीचा उमेदवार विराजमान होणार की ठाकरे बंधूंच्या युतीला संधी मिळणार, की एखादा वेगळाच राजकीय समीकरण तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही तासांत मतमोजणी पूर्ण होताच हे चित्र स्पष्ट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई महापालिकेत महापौरपद अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत अनेक नामवंत नेत्यांनी हे पद भूषवले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार आतापर्यंत कोण-कोण महापौर झाले, याची सविस्तर यादी उपलब्ध आहे. आजच्या निकालातून मुंबईच्या कारभाराची दिशा आणि आगामी राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
मुंबई महापालिका महापौरांची यादी
महापौरांची नावे
१. जेबी बोमन बेहराम
२. व्ही.एन. चंदावरकर
3. मोरेश्वर चिंतामण जावळे
4. एच.एम. रहिमतुला
5. कि एफ नरीमन
6. जे एम मेहता
7. एलिजाह मोझेस राजपुरकर
8. सुलतान एम. चिनॉय
9. बी. एन. करंजिया
10. मथुरादास त्रिकामजी
११. डॉ. जे. ए. कोलाको
12. वाय जे मेहेरअली
13. एम डीडी गिल्डर
14. एम आर मसानी
15. एन. टी. मास्टर
16. जे ए डिसोझा
17. एम आय एम रोवजी
18. ए.पी. सबावाला
19. एम यू मस्कैरेन्हास
20. जे ए डिसोझा
21. एम आय एम रोवजी
22. ए.पी.सबावाला
23. एम यू मस्कैरेन्हास
24. एस के पाटील
26. जी एन देसाई
27. पी ए डायस
28. एस ए कादर
29. एस सी फर्नांडिस
30. एम व्ही दोंडे
31. एस एस मिरजकर
32. पी टी बोराळे
33. व्ही बी वरळीकर
34. ई ए बंदूकवाला
35. बी पी दिवगी
36. एस आर पाटकर
37.जे एल डिसोझा
38. आर एन कुलकर्णी
39. जे के जोशी
40. एस जी पटेल
41. जे एल डिसोझा
42. एच एस गुप्ते
43. आर के गणात्रा
44. एस जी जोशी- शिवसेना
45. बी. के. बोमन-बेहराम
46. एन डी मेहता
47. मनोहर जोशी - शिवसेना
48. एम एस देवरा
49. व्ही एस महाडिक- शिवसेना
50. आर के चिंबुलकर
51. बी एच रोटे
52. ए यू मेमोन
53. पी. एस. पै
54. एम एच बेदी
55. छगन भुजबळ - शिवसेना
56. दत्ताजी नलावडे
57. रमेश प्रभू
58. सी एस पडवळ
59. शरद एन आचार्य
60. छगन भुजबळ- शिवसेना
61. दिवाकर रावते
62. सी डी हंडोरे
63. आरआर सिंग
64. निर्मला सामंत प्रभावळकर
65. आर टी कदम
66. मिलिंद वैद्य- शिवसेना
67. विशाखा राऊत- शिवसेना
68. नंदू साटम- शिवसेना
69. हरेश्वर पाटील
70. महादेव देवळे- शिवसेना
71. दत्ता दळवी- शिवसेना
72. शुभा राऊळ- शिवसेना..
73. श्रद्धा जाधव- शिवसेना
74. सुनील प्रभू- शिवसेना
75. स्नेहल आंबेकर- शिवसेना
76. विश्वनाथ महाडेश्वर- शिवसेना
77. किशोरी पेडणेकर- शिवसेना
