Mumbai Local : स्टेशनवर पोहोचण्याआधीच दिसणार वेळ, प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे मोठे पाऊल

Mumbai Local : स्टेशनवर पोहोचण्याआधीच दिसणार वेळ, प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे मोठे पाऊल

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी अनेक कल्याणकारी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातच आता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीचा विचार करून आता एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी अनेक कल्याणकारी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातच आता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीचा विचार करून आता एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता तुमची लोकल रेल्वे स्थानकावर किती वाजता येणार याचा टाइम तुम्हाला लोकलमधून प्रवास करतानाच कळणार आहे. आता मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमधील डिजिटल इंडिकेटरवर पुढील स्टेशनचे नाव आणि त्या स्टेशनवर लोकल किती वाजता पोहोचेल याची अचूक वेळदेखील दाखवली जाणार आहे.

यामुळे प्रवाशांना कोणत्या स्टेशनवर आपण किती वाजता पोहोचणार आहोत याची माहिती मिळणार असल्याने त्यांना सोयीचे होणार आहे. लोकलच्या गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसते. त्यात गर्दीच्यावेळी ट्रेन इतकी भरलेली असते की आपण नक्की कोणत्या स्टेशनला पोहोचलो आहोत हे बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही. यासाठी रेल्वेने डिजिटल इंडिकेटर लोकलमध्ये बसवले. त्यामुळे प्रवाशांना आपल्या स्टेशनची माहिती अचूक मिळू लागली.

आता त्यातच अजून एक फिचर ऍड केले गेले असून आता त्या डिजिटल इंडिकेटरमध्ये पुढील स्टेशन, शेवटचे स्टेशन आणि आपल्या स्टेशनवर आपण किती वाजता येणार याची वेळ सुद्धा दाखवली जाणार आहे. यामुळे आता प्रवाशांना याचा फायदा होऊन आपण आपल्या स्टेशनला किती वाजता पोहोचू याची माहिती सुद्धा लोकलमधून प्रवास करतानाच प्राप्त होणार आहे. काही दिवसांपूर्वी 100 गाड्यांमध्ये ही सुविधा करण्यात आली असून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. गर्दीच्या वेळीही यंत्रणा अनेकांच्या कामी येणार असून त्याद्वारे प्रवाशांना त्याद्वारे मोठी सोय होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com