आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार

आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार

आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे.
Published on

आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे. यात दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अतंर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना देण्यात आली आहे.

कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com