Bombay High Court Hearing On Manoj Jarange : "3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, नाही तर... " उच्च न्यायालयाचा सरकारला थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील आंदोलन सुरु असून या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी देण्यात आल्याचे कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर आज पाचवा दिवस असून जरांगेंच मराठा आरक्षणसाठी सुरु असलेल आंदोलन अजून सुरु आहे. त्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील सीएसएमटीवरील वाहतूक कोंडण्यास सुरु झाली, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना पाहायला मिळाला.
हे सगळं लक्षात घेता, जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालयाची काल सुनावणी झाली होती, ज्याची पुढची सुनावणी आज झाली आहे. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यादरम्यान मराठा आंदोलकांवर कठोर कारवाई करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, "आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, त्याचा अहवाल सादर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून काम करू" असे आदेश देत उच्च न्यायालयाने ठणकावले आहे. तसेच आज दुपारी 3 वाजता पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
यावेळी न्यायमुर्ती म्हणाले की, " 5 हजार लोकांना परवानगी दिली होती, मग जास्त लोक कशी आली? आम्ही मिडिया द्वारे अपील करतो. मुंबईत 5 हजार लोकांचा विचार करून गाडी पार्किंग संदर्भातील सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सगळ्या गाड्या हलवण्यात आल्या आहेत. तुम्ही हे सांगणार कस की तुम्ही कोर्ट ऑर्डर पळत आहात? हे खूप सिरियस आहे. त्यांनी लगेच जागा सोडली पाहिजे नाहीतर कारवाई करा. त्यानुसार आम्ही काही पावले उचलली आहेत. मुंबईतील जागा अडवू शकत नाही. हे अनाधिकृत आहे".
दरम्यान विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयासमोर मांडत मराठा आंदोलनकर्त्यांकडून झालेल्या त्रासाची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी आंदोलकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता, उच्च न्यायालयाने त्यांना प्रतिसवाल केला की, "ज्यावेळेस जास्त प्रमाणात लोक आले तेव्हा तुम्ही मिडिया द्वारे अपील केल होत का? तुम्ही प्रेस नोट काढली होती का? यांपैकी कोणती काळजी तुम्ही काळजी घेतली होती का?" असं म्हणत कोर्टाने इशारा दिला आहे, की जर 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी झाली नाही तर आम्ही कठोर कारवाई करण्यास सुरुवात करु.